- जाहिरात -spot_img
breaking news

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू…

मदतीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
शेवगाव | नगर सह्याद्री
वरूर (ता. शेवगाव) येथील देविदास कचरू तुजारे (वय 42) या तरुणाचा विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.

तो गेल्या अनेक वर्षांपासून गावातील वायरमनसोबत वीज दुरुस्ती व जोडणीची कामे करत होता. बुधवारी सकाळी काम सुरू असताना विजेचा जोरदार शॉक बसला आणि निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त नातेवाईक, ग्रामस्थ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मयताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शेवगाव येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनामुळे महावितरण कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संदीप डोळे व अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मयत देविदास तुजारे यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनांमधून तसेच रोख स्वरूपात मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने केली जाईल, असे सकारात्मक आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अधिकाऱ्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून वरूर येथे शोकाकूल वातावरणात देविदास तुजारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे वरूर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा :  महाराष्ट्राला हादरवणारं कांड, अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश; लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ