- जाहिरात -spot_img
breaking news

हा कसला उद्धटपणा, हे सगळं बंद करा, नेहा धुपिया पापाराझींवर भडकली

मुंबई / नगर सह्याद्री :
अभिनेत्री नेहा धुपिया नुकतेच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. मात्र यावेळी तिने पापाराझींना चांगलेच सुनावले आहे. त्यांचं झालं असं की, नेहा मुंबईतील एका भव्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी पोहोचली होती. कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा ती बाहेर पडत होती, तेव्हा काही फोटोग्राफर्स मागून तिचे फोटो आणि व्हिडिओ काढू लागले. हे पाहताच नेहाचा पारा चढला आणि तिने लगेचच फोटोग्राफर्सना त्यांच्या या पद्धतीवर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेहा म्हणते, “हा कसला उद्धटपणा आहे, मागून फोटो घेतला जात आहे. कोण घेतोय? हे सगळं बंद करा. माझेच नाही, तर इतर कोणाचेही असे फोटो काढायचे नाहीत. आम्ही सगळे सांगून सांगून थकलो आहोत.

कधी बॅग समोर पकडून, कधी पुस्तक आडवे धरून, तर कधी उलटे चालून आम्हाला स्वतःचा बचाव करावा लागतो. हे सर्व आता चालणार नाही. हे लगेच बंद करा. आम्ही तुमच्याशी खूप आदराने बोलतो, त्यामुळे तुम्हीही असे वागू नका.”

नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तिच्या या भूमिकेला सर्वांचं पाठिंबा दिला आहे. नेहाप्रमाणे याआधी देखील या मुद्यावरुन अनेक अभिनेत्रींनी पापाराझींना खडेबोल सुनावले होते. दरम्यान, सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून परस्पर आदराचे एक घट्ट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे कॅमेरामनने देखील फोटो काढताना थोडी संवेदनशीलता आणि मर्यादा पाळली पाहिजे, याची नेहाने करून दिली आहे.

हे सुद्धा वाचा :  रेकॅार्ड ब्रेक! धुरंधर 2 ने एकाच दिवसात ओलांडला 100 कोटींचा टप्पा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ