- जाहिरात -spot_img
breaking news

खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट…

शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरुद्ध उपोषणाचा इशारा

सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील खासगी शाळांमध्ये शालेय वस्तू आणि गणवेशाची सक्तीने आणि चढ्या दराने विक्री करून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभाराविरोधात भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, शिक्षण विभागाच्या दिरंगाईचा निषेध नोंदवत 15 जूनपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

याबाबत संघटनेचे जिल्हा संघटक भानुदास साळवे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासगी शाळा व्यवस्थापन प्रशासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून शैक्षणिक साहित्यासाठी पालकांना वेठीस धरत आहे. शालेय गणवेश आणि इतर वस्तू शाळेतूनच विकत घेण्याची सक्ती केली जात असल्याने पालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या गंभीर विषयाकडे वारंवार लक्ष वेधूनही आणि तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षामुळे शाळांचे धाडस वाढले असून, ही लूट आजही सुरूच आहे. वरिष्ठ स्तरावरून सूचना देऊनही कारवाई होत नसल्याने, शिक्षण विभाग स्वतःच्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा थेट आरोप साळवे यांनी केला आहे.

आता या प्रकरणाची दखल घेत 15 जूनपर्यंत या लूटमारीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पाल्य आणि पालकांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी आणि चुकीच्या प्रथांचे समर्थन करू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या निवेदनाच्या प्रती शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पारनेर पंचायत समिती, पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  हॉस्पिटलला पार्किंग सुविधा नसल्याने शिवसेना आक्रमक; काय दिला इशारा पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ