- जाहिरात -spot_img
breaking news

राष्ट्रपुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, 12 तासांत आरोपी जेरबंद, काय घडलं पहा…

पाथर्डी | नगर सह्याद्री
समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्याप्रकरणी पाथड पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक केली. सूरज बाबासाहेब वांढेकर (वय 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तांत्रिक तपासाच्या आधारे त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या समाजमाध्यम खात्याचा गैरवापर करून संबंधित पोस्ट प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले आहे.

बुधवारी (दि. 8) संबंधित आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच पाथर्डी शहरासह तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली. विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत पाथर्डी पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. निवेदनाद्वारे वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सखोल तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. घटना घडल्यानंतर आंदोलकांना दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने तपास पूर्ण करून आरोपीला अटक करण्यात आल्याने पाथर्डी पोलीस, सायबर सेलच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

सायबर तपासातून आरोपीचा पर्दाफाश
घटनेनंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पाथर्डी पोलीस आणि अहिल्यानगर सायबर सेलने तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान सूरज बाबासाहेब वांढेकर याने दुसऱ्या व्यक्तीच्या समाजमाध्यम खात्याचा ॲक्सेस मिळवून त्यांच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपी सूरज बाबासाहेब वांढेकर याला तिसगावमधून जेरबंद केले.

निष्पाप व्यक्तीवरील संशय दूर
संबंधित पोस्ट देविदास चंद्रभान शिरसाठ (रा.शिरसाटवाडी, ता.पाथर्डी) यांच्या नावावरील फेसबुक खात्यावरून प्रसारित झाल्यामुळे प्रारंभी संशय त्यांच्यावर गेला होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासातून खरा आरोपी शोधून काढल्याने एका निष्पाप व्यक्तीवर अन्याय होण्यापासून बचाव झाला. त्यामुळे समाजात निर्माण होणारा गैरसमजही दूर झाला.

हे सुद्धा वाचा :  कर्डिले की मोकाटे?

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ