- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद, कसा पकडला पहा

निघोज | नगर सह्याद्री

जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील कुंडवस्तीवरील सामाजिक कार्यकर्ते नानापाटील वराळ यांच्या शेतपरिसरात  शनिवारी पहाटे साडेपाच वाजता बिबट्या जेरबंद झाला आहे.
तत्पूर्वी या बिबट्याने याच वस्तीवरील शुभम अरुण वराळ यांच्या शेळीचा फडशा पाडला आहे. गेली अनेक दिवसांपासून या परिसरात दोन ते तीन बिबटे सातत्याने वावरत असून त्यांचा बंदोबस्त होण्यासाठी नाना पाटील वराळ यांनी वनविभागाकडे पिंजर्‍याची मागणी केली होती. हा शेती परिसर कुकडी कुंड नदी परिसरात असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन शेतकरी घेत असल्याने बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे.

संध्याकाळी सात वाजता वराळ वस्तीवरील शेळ्या, कोंबड्या व कुत्रे यांचा फडशा या बिबट्यांनी पाडत या वस्तीवर मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली होती. गेली दोन ते अडीच महिन्यात जवळपास लाखो रुपये किमतीच्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या व इतर जनावरे या बिबट्यांनी फस्त केली आहेत. पहाटे तीन वाजता शेळीची शिकार करणार्‍या या बिबट्याने दोन तासांतच दुसर्‍या शेळीच्या शिकार्‍याच्या वासनेने या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद व्हावे लागले.

पहाटे साडेपाच वाजता वस्तीवर राहणार्‍या निघोज सोसायटी संचालिका मनिषा वराळ यांना पिंजर्‍याचा दरवाजा मोठ्या आवाजात वाजला असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पती नानापाटील वराळ यांना उठवत पिंजर्‍यातील दुसर्‍या साईडला असणार्‍या शेळीला गोठ्यात बांधून तातडीने वनविभागाच्या अधिकार्‍यांना ही बाब सांगितली. दुसर्‍या पिंजर्‍याची मागणी करीत हा बिबट्या घेऊन जाण्याची सूचना केली. मात्र, तोपर्यंत बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याची माहिती गावभर झाल्याने हा बिबट्या पाहण्यासाठी गाव व परिसरातील नागरिक जमा झाले होते. सकाळी दहा वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी जी.व्ही.धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब भालेकर, वनरक्षक आर.टी. पाठक, वनमजूर विठ्ठल वाढवणे, सुरेश सातपुते, दिगंबर ईरोळे यांनी या ठिकाणी येऊन बिबट्याला पारनेर येथे घेऊन गेले आहेत. वनरक्षक रेश्मा पाठक म्हणाल्या की, हा बिबट्या साधारण आठ वर्षाचा असून तो नर जातीचा आहे.

हे सुद्धा वाचा :  खर्डा ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन तीन नव्या ग्रामपंचायतींची निर्मिती; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ