- जाहिरात -spot_img
breaking news

वारकऱ्यांच्या सेवेत सभापती बेलकर; दिंड्यांना रेनकोट, भगव्या टोप्यांचे वाटप

पारनेर | नगर सह्याद्री
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत वारकरी बांधवांप्रती आपली सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी अधोरेखित केली आहे. त्यांच्या पुढाकारातून पारनेर तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्यांमधील वारकऱ्यांना रेनकोट व भगव्या टोप्यांचे वाटप करण्यात आले.

खासदार नीलेश लंके करत असलेल्या वारकऱ्यांसाठीच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमाला आदर्श मानून सभापती गंगाराम बेलकर यांनी उपक्रम राबविला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारीदरम्यान वारकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रेनकोट वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला. भाळवणी येथील श्री नागेश्वर पालखी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात आले. यावेळी सभापती गंगाराम बेलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पाटचे पारनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दिंडी मार्गावर वारकऱ्यांसोबत भजनात सहभागी होत सभापती बेलकर यांनी वारकरी संप्रदायाविषयीची आपली आस्था व्यक्त केली. यंदाच्या वारीत केवळ रेनकोट व टोप्यांचे वाटपच नव्हे तर अनेक दिंड्यांना आर्थिक मदतही सभापती गंगाराम बेलकर यांनी दिली आहे.

वारकरी सेवा हीच खरी ईश्वरसेवा
वारकरी संप्रदायाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले आहेत. पुढेही सामाजिक आणि धार्मिक कार्यात आम्ही सक्रिय राहू.
-गंगाराम बेलकर, सभापती,बाजार समिती

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये जिल्हा बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ