- जाहिरात -spot_img
breaking news

३६ वर्षांच्या लोकसेवेचा गौरव; उपविभागीय अभियंता बबनराव वाळके यांचा रविवारी सेवापूर्ती गौरव समारंभ

सुनील चोभे / नगर सह्याद्री –
कुकडी पाटबंधारे उपविभाग, श्रीगोंदा येथील उपविभागीय अभियंता श्री. बबनराव शंकरराव वाळके यांच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ, समाजाभिमुख आणि उल्लेखनीय लोकसेवेचा गौरव करण्यासाठी रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा समारंभ दुपारी १२ वाजता अहिल्यानगर येथील नगर-मनमाड रोडवरील बंधन लॉन्स येथे पार पडणार असून, या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समारंभाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच माजी वनमंत्री बबनराव पाचपुते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ हे राहणार आहेत. याशिवाय माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डीले, अधीक्षक अभियंता अलका अहीरराव, मुख्य अभियंता संजीव चोपडे, साकळाई कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, हभप रामदास महाराज रक्ताटे यांच्यासह जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी, वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
समस्त वाळके परिवार, बाबुर्डी बेंद येथील ग्रामस्थ, हिवरेझरे, खडकी तसेच साकळाई उपसा सिंचन योजना कृती समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :  विधान परिषद निवडणूक; ४६१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ