- जाहिरात -spot_img
breaking news

युद्धविराम होताच सोनं महागलं, आजचे दर किती? पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
इराण-अमेरिकामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला अखेर युद्धविराम मिळालं आहे. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरूवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोनं-चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १०००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटचे सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५६ हजार ४५ रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ५४ हजार ४१० रुपयांवर गेला आहे. सोनं आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा :  मान्सूनसाठी धोक्याची घंटा; भारतावर दुष्काळाचे सावट? डिसेंबरमध्ये...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ