छत्रपती शिवाजी राजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
छत्रपती शिवाजी राजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगरच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानुसार संतोष कचरू साबळे यांची चेअरमनपदी, सुधीर दशरथ उंडे यांची व्हाईस चेअरमनपदी तर गोटीराम अंकुश मडके यांची सचिवपदी फेर निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित संचालक व सभासदांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पतसंस्थेच्या संचालक मंडळामध्ये ज्ञानेश्वर देवराम सुर्वे, सदानंद लहानू डोखे, सुधाकर प्रभाकर पगारे, संतोष तात्याबा थिगळे, श्रीकांत बाबासाहेब साळे, सुधीर दशरथ उंडे, संतोष कचरू साबळे, गोटीराम अंकुश मडके, रवि हरीश्चंद्र देशमुख, प्रशांत दशरथ सातपुते, प्रताप हनुमंत साबळे, नवनाथ बारकू गोरे, हरिश शिवराम भालेराव, ज्ञानदेव शिवाजी अडसुरे, किशोर किसनराव जेजुरकर, संतोष हरिभाऊ खंडागळे, संगीता किसनराव परोडकर, अर्चना प्रकाश गुंड आणि सुरेखा सदाशिव लांडगे यांचा समावेश आहे. सर्व संचालकांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली.जिल्ह उपनिबंधक कार्यलयातील महेश पालवे यांनी या निवडीचे काम पाहिले.
नवनिर्वाचित चेअरमन संतोष साबळे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, संस्थेने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. सभासदांचे हित, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि संस्थेची आर्थिक प्रगती या चार सूत्रांवर भर देत पतसंस्थेला अधिक सक्षम आणि आदर्श संस्था बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. प्रत्येक सभासदाला विश्वास देणारा आणि विकासाभिमुख कारभार करण्याचा आमचा प्रयत्न असेल.










