- जाहिरात -spot_img
breaking news

 अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा

अवैध मुरूम उपसा प्रकरणात तिसऱ्यांदा पंचनामा
श्रीगोंदा | नगर सह्याद्री

चांभुडी येथील शासकीय जमिनीतून झालेल्या अवैध मुरूम उपसा प्रकरणात महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईची पावले उचलली आहेत. तक्रारदार श्रीरंग साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार 15 मे रोजी संबंधित जागेचा तब्बल तिसऱ्यांदा पंचनामा करण्यात आला.
यापूव दोन वेळा करण्यात आलेल्या पंचनाम्यांवर आक्षेप घेत श्रीरंग साळवे यांनी नव्याने आणि सखोल पंचनामा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जागेची बारकाईने पाहणी केली.

या पंचनाम्यात मंडळ अधिकारी चौधरी, ग्राम महसूल अधिकारी किरण फातले, ग्रामसेवक प्रविण साळुंके तसेच महसूल कर्मचारी संतोष खंडागळे यांनी सहभाग घेतला. पंचनामा प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब पुरी, पोलिस पाटील कल्याण उदार, पप्पू नाणेकर, संकेत ढगे तसेच तक्रारदार श्रीरंग साळवे उपस्थित होते. शासकीय जमिनीतील अवैध मुरूम उपशामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी जमिनीचे नुकसान करणाऱ्या संबंधित भूमाफियांवर तहसील प्रशासन कोणती कठोर दंडात्मक कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  टेम्पो चोरणारा आरोपी जेरबंद, असा पकडला आरोपी...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ