- जाहिरात -spot_img
breaking news

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भूकंप; पटेल, तटकरे अन् भुजबळांना डच्चू? काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन यादी समोर आली असून, यामध्ये अनेक धक्कादायक बदल पाहायला मिळत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या या यादीतून पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नाव वगळण्यात आले आहे. तसेच सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील या दिग्गज नेत्यांनाही कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्यात आली. आयोगाला दिलेल्या या यादीतून पटेलांना वगळले आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे, कारण त्यांच्या नावासमोर तसा कोणताही उल्लेख दिसत नाही. विशेष म्हणजे, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे; मात्र प्रफुल्ल पटेलच नव्हे, तर सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि वळसे-पाटील यांनाही स्थान मिळालेले नाही. यादीवरून निर्माण झालेला वाद आणि चर्चा पाहता सुनेत्रा पवार यांनी तात्काळ भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, “प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक चूक झाली आहे. ही चूक लवकरच दुरुस्त केली जाईल.”

या नवीन कार्यकारिणीत अजित पवारांच्या मुलांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पार्थ पवार यांची जनरल सेक्रेटरी (सरचिटणीस) पदी, तर जय पवार यांची नॅशनल सेक्रेटरी (राष्ट्रीय सचिव) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या नव्या यादीत सुबोध मोहिते, सना मलिक, अविनाश आदिक, धीरज शर्मा, अभिषेक बोके, संजय प्रजापती, धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग आणि डॉ. रमण प्रीत सिंग यांच्या नावांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आलेल्या या कार्यकारिणीमुळे अजित पवार गटासह राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत पडले दोन गट?
राष्ट्रवादीच्या या नव्या यादीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अनुभवी नेत्यांना मिळालेला डच्चू. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेल्या पटेल यांना कार्यकारिणीतून वगळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फक्त पटेलच नव्हे, तर महाराष्ट्रातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांचेही नाव सरचिटणीस पदावरून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचसोबत छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे-पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावेही नवीन यादीतून गायब असल्याने, पक्षाने आपली जुनी फळी पूर्णपणे बाजूला केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

हे सुद्धा वाचा :  मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांनी राजीनामा न दिल्यास पुढे काय होणार? महत्त्वाची अपडेट समोर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ