- जाहिरात -spot_img
breaking news

एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा निर्णय

एकल महिला व बालकांसाठी सभेत महत्त्वाचे निर्णय

राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यात मिशन वात्सल्य समितीची सभा तहसीलदार डॉ. अमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सलग तीन महिने सभा न झाल्याच्या तक्रारीनंतर ही सभा घेण्यात आली असून, यात एकल महिला आणि एकल बालकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यात आले.

तहसील कार्यालयात झालेल्या या सभेला बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे, गट शिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, सहायक निबंधक बाळासाहेब रायकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय वाघ, महिला व बाल विकास विभागाचे एच. बी. गिरवले यांच्यासह साऊ एकल महिला समितीचे अशासकीय सदस्य व आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस उपस्थित होते.मिशन वात्सल्यअंतर्गत एकल महिला आणि बालकांना न्याय व सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने घेतलेले निर्णय तालुक्यातील हजारो कुटुंबासाठी दिलासादायक ठरणार आहे.

तालुक्यातील सर्व एकल महिलांची गावनिहाय गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व एकल बालकांची गणना करून बाल संगोपन योजनेपासून वंचित असलेल्या बालकांचा शोध मोहीम राबवली जाणार आहे. एकल महिलांच्या विविध प्रश्नांना सर्व शासकीय विभागांमध्ये प्राधान्यक्रम दिला जाईल. संजय गांधी निराधार योजनेचा जास्तीत-जास्त एकल महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एकल महिलांना वैद्यकीय बिलात सवलत मिळावी यासाठी तालुक्यातील सर्व दवाखान्यांना विनंती करण्यात येणार आहे. जे डॉक्टर एकल महिलांना मोफत वैद्यकीय सेवा देतात त्यांचा समितीच्या सभेत सन्मान केला जाणार आहे. एकल महिलांना वारसा हक्काने मिळणाऱ्या किंवा मिळालेल्या मालमत्तेबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा :  36 तासांच्या थरारक तपासानंतर अपहृत मुलगी ताब्यात, चंदुकाका सराफ मधून मिनी गंठण चोरीला, तरुणावर हल्ला, कुठे काय घडलं
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ