- जाहिरात -spot_img
breaking news

धक्कादायक! मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडिओ क्लीपने खळबळ

बीड / नगर सह्याद्री –
बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सरपंच देशमुख आणि नंतर विलास घुले हत्या प्रकरणानंतर आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना, आता एका फोन कॉलच्या ऑडिओ क्लिपमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एका व्यक्तीकडून मनोज जरांगे पाटील यांना आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. त्यानंतर रमेश घुलेविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा मुद्दा तसेच त्याचे वाल्मीक कराड याच्यासोबतचे फोटो यावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांचे परळीतील समर्थक बाळासाहेब पाथरकर यांनी रमेश घुले यांच्यावर एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर एका अज्ञात व्यक्तीने पाथरकर यांना फोन केला. फोनवरील संभाषणादरम्यान संबंधित व्यक्तीने मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत शिवीगाळ केली इतकंच नाही तर, ‘त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय” अशी धमकी सुद्धा दिली.

ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणामुळे बीडमधील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे येणे महत्त्वाचं आहे.

हे सुद्धा वाचा :  गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले; कुठे घडला प्रकार पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ