- जाहिरात -spot_img
breaking news

दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याने वाद, तरुणावर कोयत्याने हल्ला, विहिरीच्या वादातून राडा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर लोखंडी कोयता आणि लाकडी दांडयाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोल्हेगाव येथील रहिवासी लक्ष्मण जयराम काशिद यांची मुलगी घराबाहेर सायकल खेळत असताना आरोपी सिध्देश घोडके याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने मुलीला कट मारला. याचा जाब विचारण्यासाठी काशिद गेले असता आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत होऊन आरोपी सिध्देश दिनेश बुरकुले याने हातातील लोखंडी कोयत्याने काशिद यांच्या डोयावर आणि हाताच्या अंगठ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

या घटनेवेळी आरोपी दिनेश बबन बुरकुले आणि उमा दिनेश बुरकुले यांनीदेखील फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. जखमी लक्ष्मण काशिद यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी विविध कलमान्वये सिध्देश घोडके, दिनेश बुरकुले, उमा बुरकुले आणि सिध्देश बुरकुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करत आहेत.

जेऊरमध्ये विहिरीच्या वादातून हाणामारी
अहिल्यानगर –
तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात सामायिक विहिरीच्या हक्कावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेऊर येथील गट नंबर १३४२ मध्ये गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सामायिक विहिरीवर हक्क सांगितल्याच्या कारणावरून आरोपी लक्ष्मण जयवंत बनकर, सिद्धार्थ दत्तात्रय बनकर, नीता लक्ष्मण बनकर आणि प्रवीण संजय बनकर यांनी फिर्यादीच्या कुटुंबाला गाठले. यावेळी झालेल्या वादात आरोपींनी लाकडी दांडके आणि दगडाने फिर्यादीच्या पतीला व सासर्‍यांना बेदम मारहाण केली.

हे सुद्धा वाचा :  शेवगावात इंधन दरवाढीविरोधात भाकपचे आंदोलन..सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी

तसेच फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सर्वांनी मिळून शिवीगाळ केली. विहिरीवर पुन्हा हक्क सांगितला तर तुमच्या कुटुंबाला जिवंत मारून टाकूफ, अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली. जखमींना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मनिषा बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ