- जाहिरात -spot_img
breaking news

दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर शनिवारी हायस्पीड ट्रायल; सारोळा ते विसापूर दरम्यान ताशी 130 किमी वेगाने चाचणी

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, या प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात शनिवारी (दि. 30 मे) हायस्पीड इंजिन ट्रायल घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सारोळा ते विसापूर या सेक्शनमध्ये सुमारे 16.20 किलोमीटर अंतरावर ही हायस्पीड चाचणी पार पडणार असून, यावेळी इंजिनाचा वेग ताशी 130 किलोमीटर इतका असणार आहे.हायस्पीड ट्रायलदरम्यान रेल्वे मार्गावरील तसेच लगतच्या गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. लहान मुले, जनावरे तसेच अन्य व्यक्ती रेल्वे रुळांजवळ जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  नवीन एमआयडीसीत मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न; आमदार संग्राम जगताप काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ