- जाहिरात -spot_img
breaking news

इन्स्टाग्राम वादातून दोन भावांवर प्राणघातक हल्ला

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील नालेगाव भागात जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांवर चॉपर आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवरील वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, यामध्ये अभिषेक शाम टोणे आणि कुबेर टोणे हे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक टोणे हे घराबाहेर असताना चिदंबर शिंदे आणि नटराज शिंदे हे तिथे आले. आरोपी चिदंबरच्या हातात चॉपर तर नटराजकडे चाकू होता. जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांनी कुबेर टोणे याच्या डोयात आणि हातावर वार केले. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या अभिषेकवरही आरोपींनी हल्ला केला. नटराजने अभिषेकच्या डाव्या डोळ्यापाशी वार केला, तर चिदंबरने कानाच्या मागे चॉपरने मारून गंभीर जखमी केले.

भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमींच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीला धावून आले, हे पाहून दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी भावांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, साहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

हे सुद्धा वाचा :  नगरमध्ये घरकुलाचा हप्ता मंजूरीसाठी मागितली लाच, ग्रामसेवकासह तिघे जाळ्यात
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ