- जाहिरात -spot_img
breaking news

व्ही. डी. सतीशन यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी उपस्थित
केरळ :
काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे 13वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला (20 मंत्री) पदाची शपथ दिली. 61 वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच असा सोहळा पार पडला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या व्यतिरिक्त, माजी मुख्यमंत्री पी. विजयन, भाजप नेते राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेसशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते.

आज 64 वर्षांनंतर, केरळ सरकारमधील सर्व मंत्र्यांनी एकत्र शपथ घेण्याची ही दुसरी वेळ आहे. केरळ मंत्रिमंडळात पहिल्यांदाच 14 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये सी. पी. जॉन आणि एन. शमसुद्दीन, के. एम. शाजी, पी. के. बशीर आणि व्ही. ई. अब्दुल गफूर, पी. सी. विष्णूनाथ, रोझी एम. जॉन, बिंदू कृष्णा, टी. सिद्दिकी, के. ए. तुळसी आणि ओ. जे. जनिश यांचा समावेश आहे.
काँग्रेसने सभापती आणि उपाध्यक्ष ही पदे आपल्याकडे ठेवली आहेत. थिरुवनचूर राधाकृष्णन यांची सभापती आणि शनिमोल उस्मान यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केरळ विधानसभेत आमदारांच्या शपथविधीनंतर 22 मे रोजी सभापती निवडले जातील. राज्यपालांचे धोरणाभिषेक भाषण 29 मे रोजी होणार असून, राज्याचा अर्थसंकल्प ५ जूनपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री सतीशन यांनी आपली पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले . 15 जूनपासून महिलांना केएसआरटीसी बसमधून मोफत प्रवास, राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी एका विशेष विभागाची घोषणा, आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात 3,000 रुपयांनी वाढ, 2023 च्या ‘नव केरळ यात्रे’दरम्यान युवक काँग्रेस नेत्यांवर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  पाकिस्तान ख्रिस्ती समुदायावर सततचा धोका
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ