- जाहिरात -spot_img
breaking news

विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला, नागरिक रस्त्यावर; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मशाल मोर्चा

संगमनेर | नगर सह्याद्री

दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्‌‍याच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांनी एकत्र येत या विद्यार्थ्यांना समर्थन दिले. याचबरोबर केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत विराट मशाल मोर्चा सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा तीव्र निषेध केला. सरकारच्या विरोधात तरुणाई आक्रमक झाल्याचे चित्र संपूर्ण देशासह संगमनेर तालुक्यात निर्माण झाले आहे.

संगमनेर बस स्थानक येथे समविचारी प्रवाह मध्ये काँग्रेस, शिवसेना, छात्र भारती, आरपीआय, दलित पँथर, सत्यशोधक समाज, अंधश्रद्धा निर्मूलन, एनएसयुआय याचबरोबर विविध पुरोगामी संघटनांनी भव्य मशाल मोर्चा काढला. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शिवसेनेचे अमोल बोराडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, अमोल शेरकर, छात्र भारतीचे तुषार पानसरे, ॲड. रंजना गवांदे, समीर लामखडे, नूर मोहम्मद शेख, बाळासाहेब घोडके, दत्ता ढगे, अरबाज शेख, भगवान अहिरे, संदीप काकड यांच्यासह पुरोगामी पक्षांचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या देशामध्ये विकासाऐवजी जातीचे व धर्माचे राजकारण सुरू आहे. विद्यार्थ्यांचे 21 दिवसांपासून आंदोलन सुरू असून केंद्र सरकारला त्यांचा आवाज ऐकू येत नाही हे दुर्दैव आहे. हे विद्याथ देशाचे नागरिक आहे. भविष्य आहे.

मात्र त्यांच्यावर अमानुषपणे लाठी हल्ला करून केंद्र सरकारने हुकूमशाही दाखवली आहे. संसदेमध्ये विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही खासदार राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केले यावेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली हे अत्यंत निंदनीय आहे.विद्याथ लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहे मात्र आंदोलन चिरडण्याच्या पद्धतीच्या जगामधून तीव्र निषेध होत आहे. डॉ.तांबे म्हणाले की, पहिले धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधानांमध्ये थोडी सुद्धा संवेदनशीलता राहिलेली नाही. विद्यार्थ्यांची ते बोलायला तयार नाहीत हा काय प्रकार आहे. देशामध्ये दररोज लोकशाहीची हत्या केली जात आहे. हे थांबवण्यासाठी सर्वांनी पेटवून उठा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विविध कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकपणे केंद्र सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. मोदी सरकार हाय हाय. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या विद्यार्थ्यांना न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा :  पालकमंत्र्यांच्या निर्णयाने शेतकर्‍यांना दिलासा; 'या' तारखेला सुटणार पाणी

सरकार विरोधात तरुण आक्रमक
संगमनेर बस स्थानक ते माळीवाडा येथील महात्मा फुले स्मारक हा सर्व परिसर युवक महिला व कार्यकर्त्यांच्या मशालींनी पेटून उठला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याने सर्व रस्ते बंद झाले होते. संगमनेर मध्ये घोषणांचा निनाद सुरू होता. पावसाच्या रिमझिम मध्ये ही तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भव्य मशाल मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ