- जाहिरात -spot_img
breaking news

एक वर्षापासून फरार असलेला खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील खून प्रकरणातील तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार ऊर्फ गोट्या हरकुस बोठे (रा. देऊळगाव सिद्धी, ता. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२२ जून २०२५ रोजी गुंडेगाव येथील छत्रपती चौक परिसरात जुन्या वादातून बळीराम देविदास शिंदे (वय २८, रा. गुंडेगाव) यांची पाच जणांनी संगनमत करून हत्या केली होती. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपी आनंद वरकड व ओंकार ऊर्फ गोट्या बोठे हे दोघे फरार होते.
दरम्यान, ८ जुलै २०२६ रोजी नगर तालुका पोलिसांनी ओंकार ऊर्फ गोट्या हरकुस बोठे याला अटक केली. गुन्हा घडल्यापासून तो सुमारे एक वर्ष फरार होता. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्म आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ. सुभाष थोरात, मंगेश खरमाळे, नितीन शिंदे आणि विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने केली.

हे सुद्धा वाचा :  मागची सवय अजून गेली नाही का?; पालकमंत्री विखे पाटील संतापले, अधिकाऱ्यांना धरले धारेवर...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ