आमदार संग्राम जगताप यांची कठोर कारवाई करण्याची मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यात विविध गावांमध्ये जिहादी वृत्तीचे अनेक भोंदू डॉटर बर्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. या भोंदू डॉटरांकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी किंवा ज्ञान नसते. तरीही ते सर्वसामान्य रुग्णांवर बोगस औषधोपचार करत आहेत. नुकतीच राहुरी मधील अशाच भोंदू डॉटर तन्वीर देशमुख व श्रीरामपूर येथीलही भोंदू डॉटर राज शेख यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पण असे वैद्यकीय पदवी नसलेले बरेच भोंदू अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात व संपूर्ण राज्यात सर्रासपणे बोगस औषधोपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. नगर, राहुरी, राहता, श्रीरामपूर येथील या भोंदू डॉटरांचे देशद्रोही बंटी जहागीरदारशी काही संबंध आहेत का? त्यांचे फंडिंग कोठून होते? याचीही चौकशी झाली पाहिजे. जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निष्काळजीपणामुळेच या भोंदू डॉटरांचे फावते आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी शासनाने करावी. जिल्हा, तालुका व शहरातील संबधित आरोग्य खात्यातील व पोलीस अधिकार्यांनी अशा भोंदू डॉटरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने जामीन न होणारे कडक कलमे लाऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी केली.
आ. जगताप यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, जिहादी भोंदू डॉटर सोशल मिडीयाच्या माध्यमातून बोगस औषधोपचाराचे रील बनवून सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही बोगस औषधांचा साठा करून ते सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करून हे जिहादी त्यांची फसवणूक करत आहेत. नागरिकांनी सोशल मिडीयावरील खोट्या रीलला बळी पडू नये व अशा बोगस डॉटरांकडे जाऊ नये. असे शेकडो भोंदू डॉटर नगर जिल्ह्यात सर्रासपणे कार्यरत आहेत.
जिल्हा प्रशासन, सिव्हील सर्जन यांनी आजपर्यंत केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने त्या बोगस डॉटरांचे फावले आहे. त्यामुळे शासनाकडून सिव्हील सर्जन यांचीही चौकशी झाली पाहिजे. अधिकारी व बोगस डॉटर यांची काही संबंध आहेत का; यांचीही चौकशीची मागणी मी शासनाकडे करत आहे, असेही आ.जगताप यांनी सांगितले.आ. जगताप म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉटरांच्या ज्या विविध अधिकृत संघटना आहेत त्यांनीही अशा अधिकृत नोंद नसलेल्या भोंदू डॉटरांचा शोध घेऊन त्यांच्यवर कडक कारवाई होण्यासाठी पुढाकार घेऊन वैद्यकीय क्षेत्र बदनाम केल्याचा वेगळा गुन्हा दाखल करावा. मानवी जीवाचा खेळ करणारे हे भोंदू डॉटर हे ह्यूमन ट्रायल घेत होते का? हा सुद्धा फार मोठा संशय असून याची सुद्धा तपासणी झाली पाहिजे.










