- जाहिरात -spot_img
breaking news

नगर, नाशिकमध्ये अवकाळीचा इशारा; प्रचंड उष्णता वाढणार, काय आहे इशारा पहा…

पुणे | नगर सह्याद्री
राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र या प्रचंड उष्णतेनंतर आता महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. १७ एप्रिलपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढत जाऊन तापमान ४५ अंशांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता असून, त्यानंतर १८ एप्रिलपासून राज्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला आहे.

हवामानातील या बदलाचा मोठा फटका अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याला बसण्याची शयता आहे. या भागात २० आणि २१ एप्रिल रोजी अवकाळी पावसाचे आगमन होऊन जोरदार गारपीट आणि ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शयता आहे. २१ आणि २२ एप्रिल रोजी पावसाचा जोर सर्वाधिक असेल. ओमान आणि इराणसारख्या वाळवंटी भागातून येणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे तापमानात मोठी वाढ झाली असली, तरी १८ एप्रिलनंतर ढगाळ हवामान तयार होऊन पावसाचे उत्तरेकडे मार्गक्रमण होईल.

मे महिन्यातही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होण्याची शयता असल्याने मे महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल. या चक्रीवादळांमुळे यंदा मान्सून लवकर सुरू होण्याचे संकेत आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा ५ ते ६ टक्के कमी असला, तरी तो समाधानकारक राहील, असे अनुमान जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी वर्तविले आहे.

हे सुद्धा वाचा :  देश पोखरणार्‍या डाव्या वाळवीपासून सावध राहा; प्रसिद्ध लेखक अभिजीत जोग यांचा सांस्कृतिक मार्सवादावर हल्ला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ