- जाहिरात -spot_img
breaking news

रिमझिम पावसाने नगर-मनमाड राज्यमार्गाचे पितळ उघडे…डांबरीकरण उखडले

रस्त्यावर खड्डे, निकृष्ट डांबरातून निखळलेल्या खडीचा रस्त्यावर सडा

कोल्हार | नगर सह्याद्री
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली असून, प्रामुख्याने शेतकरी आणि सामान्य नागरिक यामुळे सुखावला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूव केलेले नगर -मनमाड राज्यमार्गाचे डांबरीकरण या पावसामुळे अक्षरशः उखडले असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. खड्ड्यातून बाहेर आलेली खडी अपघाताला निमंत्रण देत आहे.

गेल्या चार दिवसांपासून आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेली कपाशी, सोयाबीन, मका, मूग, मठ यासारखी नगदी पिके बहरली असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. वातावरणात असलेला उकाडा कमी झाल्याने सामान्य नागरिक देखील सुखावला आहे,

मात्र, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कुंभमेळ्याच्या धरतीवर हाती घेतलेल्या नगर -मनमाड राज्यमार्गाचे पितळ या रिमझिम पावसाने उघडे पाडले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असलेली शिड आणि शिंगणापूरला जोडणारा महत्वाचा दुवा असलेला नगर-मनमाड राज्यमार्गाचे काम गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहे. अनेक निरपराध जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला हा रस्ता असून याचे काम निदान कुंभमेळ्याच्या धतवर उत्कृष्ट होईल, असे नागरिकांना वाटत होते,

मात्र, गेल्या दोन ते चार दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसाने या कामाचे पितळ उघडे पाडले आहे. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील महावितरण केंद्राच्यालगत झालेले डांबरीकरण उखडले असून, खड्ड्यातून बाहेर आलेली कच, खडी रस्त्यावर पसरू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अपघातांना निमंत्रण हे खड्डे देत असल्याने या कामाबद्दल स्थानिक रहिवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे,

हे सुद्धा वाचा :  केडगावमध्ये शेतकरी कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पतीला फोन केल्याने तरुणीसह कुटुंबाला मारहाण
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ