- जाहिरात -spot_img
breaking news

डीजेचा दणदणाट; थेट नवरदेवावर गुन्हा, अहिल्यानगरमधील पहिली घटना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरातील बोल्हेगाव परिसरात रात्रीच्या वेळी नियमांची पायमल्ली करून ध्वनिक्षेपकाचा दणदणाट करणे नवरदेवासह चालकाला अंगलट आले आहे. जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश झुगारून वरात काढल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच थेट नवरदेवासह चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नाईक रवींद्र तुकाराम घुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सात मार्च रोजी रात्री बोल्हेगाव येथील आंबेडकर चौकात नवरदेव सोनु उर्फ संदेश राजेंद्र गायकवाड याची वरात निघाली होती. यावेळी मर्यादेबाहेर ध्वनिक्षेपक सुरू असल्याने ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले गेले. गस्त घालणार्‍या पोलिस पथकाने ध्वनिक्षेपक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, नवरदेव सोनु उर्फ संदेश राजेंद्र गायकवाड आणि ध्वनिक्षेपक चालक गणेश बाळासाहेब कोलते यांनी पोलिसांच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

ध्वनी तीव्रता मोजमाप यंत्राद्वारे तपासणी केली असता आवाजाची पातळी ८२.४ डेसिबल इतकी आढळून आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  अक्षयतृतीया पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ