- जाहिरात -spot_img
breaking news

निकालापूर्वीच अक्षय कर्डिले यांच्या अभिनंदनाचे फ्लेस झळकले

सुपा परिसरात राजकीय वातावरण रंगले!
सुपा | नगर सह्याद्री
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे. निकालापूर्वीच मतदार संघासह अहिल्यानगर -पुणे महामार्गावर महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या अभिनंदनाचे फ्लेस लागले आहेत.

सुपा येथील सुखदेव पवार, राहुल पवार यांनी लावलेल्या या अभिनंदनाच्या बोर्डांमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो. आमदार अक्षय कर्डिले यांचे हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे फ्लेस हे केवळ शुभेच्छा नसून, त्यांच्या विजयाबाबतची खात्री आणि पाठिंबा दर्शवणारे प्रतीक ठरले आहेत.

अजून अधिकृत निकाल जाहीर व्हायचा असताना अशा प्रकारे अभिनंदनाची सुरुवात झाली आहे. समर्थकांच्या मनातील विश्वास किती दृढ आहे, हेच यातून दिसते. सुपा परिसरात या फ्लेसची चांगलीच चर्चा सुरू असून, काही जण याला कार्यकर्त्यांचा अतिउत्साह म्हणत आहेत, तर काहीजण यामध्ये निष्ठा आणि जिव्हाळा पाहत आहेत.

आता सर्वांचे लक्ष अंतिम निकालाकडे लागले आहे. मात्र तोपर्यंत सुपा येथील हे अभिनंदन फ्लेस चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

हे सुद्धा वाचा :  दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर शनिवारी हायस्पीड ट्रायल; सारोळा ते विसापूर दरम्यान ताशी 130 किमी वेगाने चाचणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ