- जाहिरात -spot_img
breaking news

मांडओहळ धरण परिसरात पाणी उपशावर कडक निर्बंध

15 जूननंतर मोटारी जप्त करून गुन्हे दाखल करणार

पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील कर्जुले हर्या आणि मांडओहळ धरण परिसरात तीव्र पाणीटंचाई घोषित करण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने खासगी पाणी उपशावर कडक निर्बंध लादले आहेत. नागरिकांनी व शेतकऱ्यांनी 14 जूनपूव आपल्या इलेक्ट्रिक मोटारी आणि पाईप्स स्वतःहून काढून घ्यावेत; अन्यथा 15 जूननंतर हे साहित्य जप्त करून संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.

श्रीगोंदा-पारनेरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, या परिसरात ‌‘महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009‌’ मधील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. सध्या मांडओहळ धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे. तरीही या परिसरातील खासगी बोअरवेल आणि विहिरींच्या माध्यमातून तालुक्यातील तब्बल 29 टंचाईग्रस्त गावांना 30 टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केवळ मांडओहळ धरण परिसरच नाही, तर तालुक्यातील सर्व गावांमधील सार्वजनिक तलाव आणि इतर उपलब्ध पाणी स्रोतांमधील खासगी पाणी उपसा साधने हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय पाणीपुरवठा योजना आणि मंजूर सहकारी संस्था वगळता इतर कोणतीही साधने (मोटारी, पाईप्स) आढळल्यास ती जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

प्रशासनाने घातले नियम
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून 500 मीटर अंतरात कोणत्याही कारणासाठी नवीन विहीर खोदण्यास सक्त मनाई.पिण्याच्या स्रोतावर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या विहिरींमधून पाणी काढण्यास मनाई. सार्वजनिक पाणी स्रोतांपासून एक किलोमीटर परिसरातील विहिरी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचे आदेश. जलस्रोतांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवली आहे.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
सध्या पावसाची अनिश्चितता आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा ताळमेळ घालणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यातील 29 गावांची तहान याच परिसरातील पाण्यावर भागवली जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी सहकार्य करून 14 जूनपर्यंत आपली खासगी साधने हटवावीत. 15 जूननंतर कारवाईत कुणाचीही गय केली जाणार नाही, थेट साहित्य जप्ती व गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल.
– तहसीलदार व गटविकास अधिकारी, पारनेर

हे सुद्धा वाचा :  लोणी बुद्रुकचे तलाठी कार्यालय चोरट्यांनी फोडले
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ