पारनेर | नगर सह्याद्री-
पारनेरच्या शिवछत्रपती कुस्ती संकुलाचा राष्ट्रीय खेळाडू तथा नगरसेवक पै. युवराज पठारे यांचा भाचा व शिष्य पै. चेतन रेपाळे याची 23 वर्षांखालील वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत त्याने खुल्या (ओपन) 125 किलो वजन गटात राष्ट्रीय स्पर्धेचे तिकीट मिळविले आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा हरियाणातील रोहतक येथे होणार असून, त्याच्या निवडीमुळे पारनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पै. चेतन रेपाळे हा सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. यापूव त्याने राजे छत्रपती शिवाजी महाराज 14 वी उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावून आपली ताकद सिद्ध केली होती. तसेच महाराष्ट्र केसरी 2024 स्पर्धेतील खुल्या गटात तृतीय क्रमांक मिळविला असून देवाभाऊ केसरी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय स्तरावरील अनेक सुवर्णपदके आणि राष्ट्रीय स्पर्धांसाठी झालेली निवड ही त्याच्या यशस्वी कारकिदची साक्ष आहे. शिवछत्रपती तालीम, पारनेर येथे तो पै. युवराज पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतो. त्याला पै. हर्षवर्धन सदगीर, पै. शंकर खोसे, पै. धनंजय खर्स, पै. शामलाशर्मा आणि पै. नितीन पोवार यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.याशिवाय पै. कुंडलिक पठारे, पै. बाळासाहेब पठारे, पै. यशवंत (आबा) पठारे यांच्यासह संपूर्ण पठारे कुटुंबाचे त्याला भक्कम पाठबळ मिळत आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच चेतनची प्रगती वेगाने होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.










