- जाहिरात -spot_img
breaking news

दिल्लीगेटला काँग्रेसविरोधात भाजपचे आंदोलन; जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, … तर भाजप रस्त्यावर उतरेल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाने खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाचा निषेध अहिल्यानगर शहर भाजप व युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला. बुधवारी सायंकाळी दिल्लीगेट येथे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस व खा.राहुल गांधीच्या निषेधाचे फलक झळकावत अराजक व बेजबाबदार राजकारणाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणला.

यावेळी अनिल मोहिते म्हणाले, वेदेशी शक्तीचे बाहुले बनलेल्या काँग्रेस पक्षाने आता गलिच्छ राजकारण सुरु केले आहे. ग्लोबल फोर्सच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या कटात काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. संपूर्ण देशात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये नागरिकांनी काँग्रेसला नाकारले आहे. त्यांचे शल्य त्यांना असल्याने खा.राहुल गांधी यांनी देशाचे सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आंदोलन केले. काँग्रेसने केलेल्या या आंदोलनाचा आम्ही निषेध करून काँग्रेसने जर पुन्हा अशी देश विरोधी भूमिका घेतली तर भाजपचे पदाधिकारी रस्त्यवर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला. युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋद्रेश आंबाडे म्हणाले, युवकांची माथी भडकावून काँग्रेसचे नेते देशात अराजकता पसरावत आहेत.

स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी खा.राहुल गांधी व त्यांचे नेते युवकांचा वापर करत आहेत. मात्र देशातील भाजपचे सरकार युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सक्षम असल्याने योग्य निर्णय घेईल.उपमहापौर धनंजय जाधव, महिला आघडीच्या अध्यक्षा प्रिया जानवे यांनीही काँग्रेसने युवकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून घाणेरडे राजकारणाची सीमा ओलांडली असल्याचा मनोगतातून काँग्रेसचा निषेध केला. यावेळी सरचिटणीस अशोक गायकवाड, संजय गायकवाड, अनिल सबलोक, उदय अनभुले, बाबासाहेब सानप, कालिंदी केसकर, ज्योती दांडगे, गीता गिल्डा, मुकुल गंधे, महेश गुगळे, ज्ञानेश्वर धिरडे, सुरेखा जंगम, पूजा आहेर, महावीर कांकरिया, देवेंद्र दुधाले, पियुष जग्गी, ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब भुजबळ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

हे सुद्धा वाचा :  घाटघरला भात अवनीस वेग...; धबधबेही कोसळू लागले, भंडारदरा धरणात इतका साठा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ