- जाहिरात -spot_img

दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार; केली अशी व्यवस्था

मुंबई / नगर सह्याद्री :
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढला आहे. इराणने अमेरिकेचा बदला घेण्यासाठी ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली.

अमेरिका इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा पूर्णपणे बंद आहे. यादरम्यान, दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

१६४ प्रवासी मुंबईत दाखल होणार
फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार आहेत. ही विमानं आज संध्याकाळी भारतात येणार असून यामधून १६४ प्रवासी मुंबईत दाखल होणार आहे. त्यानुसार आज दुपारी फुजैरा विमानतळ येथून स्टार एअरची दोन विशेष विमाने मुंबईकडे उड्डाण करणार आहेत.

यामध्ये व्हीटी-जीएसओ –दुपारी ३.३० वाजता एक उड्डाण तर व्हीटी-जीएसएच – दुपारी ४.३० वाजता उड्डाण करणार आहे. या दोन्ही विमानांद्वारे एकूण १६४ प्रवासी संध्याकाळी ५.३० ते ७.०० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल होतील.
या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आणि इतर भागांतील नागरिकांचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अडकलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना धीर दिला होता. “काळजी करू नका, महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी आश्वासन दिले होते.

हे सुद्धा वाचा :  खरातला गुरु मानलं होतं, पण…; राजीनाम्यानंतर रूपाली चाकणकरांनी स्पष्ट केली भूमिका...
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com