- जाहिरात -spot_img
breaking news

क्रांती चौकातील अतिक्रमणावर नगरपरिषदेचा हातोडा; महामार्गाच्या कामातील अडथळे हटवले

मुख्याधिकारी घाडगे मोहिमेत सहभागी
शेवगाव | नगर सह्याद्री
शेवगाव शहरातील क्रांती चौक परिसरातील अतिक्रमणावर शेवगाव नगर परिषदेने बुधवारी (दि. २०) संध्याकाळी धडक कारवाई केली. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वतः अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी होत कर्मचार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली.

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी तसेच सुरू असलेल्या विकासकामांना अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई होत आहे. सध्या तिसगाव-पैठण महामार्गाच्या रस्ते विकासाचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरू असून, शहरातील काही ठिकाणी अतिक्रमणामुळे कामात अडथळे निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर क्रांती चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
या मोहिमेत नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवगाव पोलिस ठाण्याचे अंमलदारही यावेळी उपस्थित होते. कारवाईदरम्यान परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नगर परिषदेच्या या धडक कारवाईची शहरभर चर्चा सुरू होती.

नगरसेवकाच्या मागणीला कात्रजचा घाट
हातगाडी चालकांनी बनवलेला कच्चामाल, काही खाद्यपदार्थ त्यांना आजच्या दिवस विकू द्या. आज सूचना द्या आणि उद्या ते गाड्या लावणार नाहीत, अशी भूमिका एका नगरसेवकाने मांडली. मात्र, अनेकदा सूचना, नोटीस दिल्या असल्याचे म्हणत मुख्याधिकार्‍यांनी काहीही एक न ऐकता धडक मोहीम राबवली. तसेच बाजारतळात दुकान लावण्याचीही सूचना केली.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगरमध्ये ठाकरे सेनेला धक्का, जिल्हाप्रमुखाचा जय महाराष्ट्र
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ