- जाहिरात -spot_img
breaking news

वांगचूक यांच्या उपोषणाला अळकुटीकरांचा पाठिंबा

एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

पारनेर | नगर सह्याद्री
लडाखचे शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवत पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.

देशातील शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता, स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत आंदोलकांनी केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी ज्येष्ठ नेते बाबाजी भंडारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे, सखाराम उजागरे (सर), सरपंच डॉ. कोमल भंडारी, कोरठण येथील खंडोबा देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे, माजी उपसरपंच अरिफभाई पटेल, व्यवसायीक रमेशशेठ खेडकर, बाळासाहेब धोत्रे, बाळासाहेब पुंडे, संजय  मते, बाळासाहेब चौधरी, मारुती मस्कुले, अतुल साखला, सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे, नवनाथ भंडारी, निजाम मोमीन, इर्शाद शेख, सुभाष पुंडे, शुभम शिरोळे, बाळासाहेब गुजर, आयान तांबोळी, संतोष थोरात, बबनराव पावडे, गुलाब मोमीन, शिवा जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भास्करराव शिरोळे म्हणाले, सरकारने सोनम वांगचुक यांच्या जीवाशी खेळू नये. त्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी दूर करून विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना न्याय मिळेल, अशी पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी. शिक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळ घालणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा करण्यात यावी. उपस्थितांनी सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत, केंद्र सरकारने त्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबवाव्यात, अशी एकमुखी मागणी केली.

हे सुद्धा वाचा :  पाऊस पडण्यासाठी गाभारा जलमय.... कामरगावकरांचे महादेवाला साकडे
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ