आजचा दिवस चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे (गजकेसरी राजयोग) काही राशींसाठी अत्यंत लाभदायक आणि आर्थिक प्रगतीचा असणार आहे.
तूळ : आज प्रगतीची उत्तम संधी मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मात्र, कोणत्याही वादविवादात पडणे टाळा.
मेष : घरातील लोकांसोबत सुखद वेळ जाईल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी चांगला ताळमेळ राहील. वरिष्ठांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
वृषभ : नवीन काम सुरू करताना द्विधा मनस्थिती होऊ शकते. घाईगडबडीत कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : सकाळपासूनच उत्साही वाटेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क : कर्क राशीत ‘गजकेसरी राजयोग’ तयार होत आहे. त्यामुळे अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल.
सिंह : विविध माध्यमातून लाभ मिळतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कन्या : जुने येणे वसूल होईल. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अत्यंत शुभ आहे.
वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवा. नवीन काम सुरू करणे आज टाळावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
धनु : भाग्याची उत्तम साथ लाभेल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन कामाची सुरुवात होईल
मकर : कामाचा ताण जाणवेल. संयम बाळगणे गरजेचे आहे. आर्थिक लाभ होईल, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कुंभ : अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ वार्ता समजतील.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेले काम पूर्ण झाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.










