- जाहिरात -spot_img
breaking news

राज्यावर दुहेरी संकट; कडक उन्हाळ्यात अवकाळीचा इशारा, अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा…

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यातील जनतेला उन्हाच्या झळासोबत आता पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. दुसरीकडे प्रादेशिक हवामान विभाग नागपूरने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होईल असा इशारा दिला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

मागील काही दिवसांपासून पश्चिमी वादाळाचा प्रभाव पूर्वेकडे सरकल्याने राज्यातील काही भागांवर पुढील दोन दिवस वादळाचा प्रभाव राहणार असून हवामान विभागाकडून पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आलाय. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून बहुतांश जिल्ह्यातील उकाड्यात लक्षणीय वाढ झालीय.

राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद विदर्भात होत आहे. येथील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटसदृश्य स्थिती कायम आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा येथील पारा ४६ अंशावर पोहोचलाय. विदर्भातील अमरावती येथे सोमवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. येथे ४६.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. तर अकोला ४६.३, वर्धा ४६.५, चंद्रपूर ४५.२ तसेच नागपूर येथे ४५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

विदर्भ उष्णतेमुळे तापला असताना मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात देखील तापमानात प्रचंड वाढ झाल्याने झिरो ते पाच वर्ष वय असलेल्या चिमुकल्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सद्या हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळे त्रास जाणवत असल्याने ज्येष्ठ नागरिक व चिमुकले उपचारासाठी भरती होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर दुचाकीवरून प्रवास करणारे अनेकजण डोक्याला पांढरा रुमाल डोळ्याला चष्मा लावत असतात.

परंतु त्यांनाही उन्हाचा त्रास होत आहे.त्या नागरिकांना देखील उष्मघाताचा त्रास होत असल्याचं नागरिक सांगत आहेत. दरम्यान हिंगोली जिल्ह्याला आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिला आहे. हिंगोली जिल्ह्याचे आज सरासरी तापमान 42 अंशाच्या पुढे गेल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  कैसा हराया…सहर शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात; काय झालं पहा

अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा
अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. कडक उन्हामुळे फळबागांना फटका बसू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. विशेषतः डाळींब बागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. उन्हाच्या झळांपासून फळांचे नुकसान टाळण्यासाठी डाळींब बागांवर पांढऱ्या कापडाचे आच्छादन घालण्याचा पर्याय अनेक शेतकरी वापरत आहेत.

उष्णतेच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
अकोला ४६.९, अमरावती ४६.८, ‎वर्धा ४६.४, ‎यवतमाळ ४६, नागपूर ४५.४, चंद्रपूर ४५. अंश डिग्री सेल्सअसवर पोहोचले आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यात उष्णतेचा “यलो अलर्ट’
हवामान विभागाने २९आणि ३० एप्रिल साठी विदर्भातील सर्व जिल्ह्यात उष्णतेचा “यलो अलर्ट” जारी केला आहे. तसेच २९ आणि ३० एप्रिल रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊसही होऊ शकेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रति तास एवढ्या गतीने वाराही बाहेर अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पावसाची शक्यता कुठे ?
विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवस या प्रदेशात पावसाळी हवामान राहील. या दरम्यान ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ