- जाहिरात -spot_img
breaking news

नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी; कोर्ट काय म्हणाले पहा

पुणे / नगर सह्याद्री –
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या नसरापूर येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. आरोपी भीमराव कांबळे याने १ मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर क्रूरपणे अत्याचार करून नंतर तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी निकाल देताना न्यायमूर्तींनी आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत, असे सांगत आरोपीला दोन गुन्ह्यात फाशी आणि दोन गुन्ह्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे, असे निकाल सुनावताना सांगितले.

न्यायमूर्ती म्हणाले, ‘प्रसंग आठव आणि काय शिक्षा पाहिजे ते तूच सांग’
यावेळी निकाल सुनावताना न्यायमूर्तींनी प्रसंग आठव आणि तूच तुला काय शिक्षा पाहिजे ते सांग,असे आरोपी भीमराव कांबळे याला विचारले. तेव्हा आरोपी भीमराव कांबळे हा निरुत्तर झाला. दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याच्यावर गुन्हे सिद्ध झाल्याने त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी केली आहे.

न्यायमूर्ती प्रकरणाचा निकाल सुनावत असतानाही आरोपी भीमराव कांबळे याने बनाव केला. मी त्या मुलीला गाठी शेव घेऊन देण्यासाठी घेऊन जात होतो. तेव्हा मी घसरून पडलो आणि माझ्या डोक्याला लागलं, असा दावा आरोपीने केला.

कठोरात कठोर शिक्षा द्या, सरकारी वकिलांची मागणी
दरम्यान, या प्रकरणातील दोषी आरोपी भीमराव कांबळे याला कोणती शिक्षा सुनावण्यात यावी, यावर कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. यावेळी हे संपूर्ण कृत्य हे वासनेच्या भारात केले होते. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याचा कुठलाही पच्छाताप दिसत नाही आहे. त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.

आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
राज्याच्या न्यायालयीन इतिहासात इतक्या वेगाने निकाल लागलेला हा पहिलाच खटला असल्याचं मानले जातेय. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे या ६५ वर्षीय नराधमाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या खटल्याचा निकाल देत दोषी ठरवले आहे.

हे सुद्धा वाचा :  शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव, कोण काय म्हणाले पहा

न्यायाधीशांचा कांबळेला प्रश्न तुला कोणती शिक्षा द्यायची?
अंतिम सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपी भिमराव कांबळे याला तुला कोणती शिक्षा द्यायची, फाशीची की जन्मठेपेची, अशी विचारणा केली. त्यावर मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो, त्या मुलीच्याही डोक्याला मार लागला आणि तिचा मृत्यू झाला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ती सारखी ओरडत असल्याचा बनाव केला. त्यावर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी त्याला तू जे सांगत आहे, तो इतिहास झाला आहे, तुझ्यावर आता गुन्हा सिद्ध झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने कोणतेच उत्तर दिले नाही.

नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी
न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे. सरकारी वकिल युक्तीवाद करत आहेत आणि त्यांच्याकडून भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी करण्यात आली आहे.

सरकारी वकीलांचा युक्तीवाद
भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आले असल्याचे सरकारी वकिलांनी यावेळी सांगितले आहे. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखमा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या. आरोपीचा आतापर्यंतचा इतिहास आणि पार्श्वभूमी बघता हा आरोपी सुधारण्याच्या पलिकडे गेला आहे, असं कोर्टाने म्हटलं. अनेक पुरावे आणि साक्षीदार पाहून आरोपीचा हा गुन्हा सिद्ध झाला आहे.

समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कृत्य केले तर भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेले आहे. सरकारी वकिलांकडून अशाच गंभीर गुह्याच्या खटल्यांचा आणि त्यामधे सुनावण्यात आलेल्या खटल्यांचा संदर्भ देण्यात आला. आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडण्याची भिती देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी जेणेकरुन कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना चारवेळा विचार करेल, अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा :  तलाठी भरती आता MPSC घेणार; १७०० हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू...

प्रकरणाच्या सुरूवातीलाच न्यायाधीशांनी त्याला या प्रकरणात दोषी ठरवलं. या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सरकारी वकील प्रयत्न करत होते. यावेळी त्याचं कुटुंबही त्याच्या सोबत नव्हतं. आरोपीला सात मुलं आणि पत्नी आहे, मात्र कोणीही कोर्टात हजर राहिले नाही.

दुसरीकडे सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आरोपीच्या वर्तनावरही भाष्य केले. आरोपीला स्वतःची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. न्यायालयाने त्याला अनेक प्रश्न विचारले, मात्र त्याने कोणतीही स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. आरोपीची मानसिक स्थिती आणि लैंगिक क्षमता यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आले असून त्यातून आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे तसेच लैंगिक कृत्य करण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले. आता या अत्यंत संवेदनशील आणि चर्चेतील प्रकरणात न्यायालय २९ जून रोजी शिक्षेबाबत अंतिम निर्णय देणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ