- जाहिरात -spot_img
breaking news

वाघोली ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर ‌‘रेडा आंदोलन…कारण काय

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील परीक्षणावर गंभीर आरोप;

शेवगाव | नगर सह्याद्री
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना‌’तंर्गत तालुकास्तरीय ग्रामपंचायत परीक्षणासाठी आलेल्या केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या समितीकडून वाघोली ग्रामपंचायतीवर मोठा अन्याय झाला आहे. वाघोली गावाला ‌‘माझी वसुंधरा‌’ अभियानासह विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले असतानाही, संबंधित समिती तसेच शेवगाव व केज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोड करून वाघोली गावास अपात्र ठरवले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावांचे पुनर्परीक्षण करून अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी बीड जिल्हा परिषदेसमोर ‌‘रेडा आंदोलन‌’ केले.

वाघोली येथे गेल्या 10 वर्षांपासून वृक्षारोपण, जलसंधारण, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर आणि सेंद्रिय शेती याबाबी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर राबवून एक चळवळ उभी राहिली आहे. ग्रामविकासाबरोबरच पर्यावरण संतुलनामध्ये श्रमदानातून उभा केलेल्या या कौतुकास्पद कामामुळे राज्य सरकारने गावाला ‌‘माझी वसुंधरा‌’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार देऊन सलग तीन वेळा गौरव केला आहे.

यावर्षीच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात देखील ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून उत्तम नियोजन व तयारी केली होती. असे असतानाही, तालुकास्तरीय परीक्षण व पाहणीसाठी आलेल्या केज (जि. बीड) येथील गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे व त्यांच्या समितीने आर्थिक तडजोड करून वाघोली गावाला डावलले आणि इतर गावांना पात्र ठरवले.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शेवगाव व केज येथील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करावे, सर्व ग्रामपंचायतींचे पुन्हा परीक्षण करण्यात यावे, अशी मागणी करत बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा परिषद कार्यालय असा निषेध मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सरपंच सुश्मिता भालसिंग, उपसरपंच कल्पना भालसिंग, उमेश भालसिंग, भीमराज सागडे, शिवाजी भिसे, राजेंद्र आढाव, शंकर काटे, मंखळ पांढरे, बाळासाहेब देशपांडे, बाबासाहेब गाडगे, भाऊसाहेब शिंगटे, दत्तू दातीर, जगदीश जमधडे, संतोष आल्हाट, घनशाम वांडेकर, दगडू बोरुडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा :  कर्नाटकमध्ये आता शिवकुमार पर्व...सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ