- जाहिरात -spot_img
breaking news

मैत्रिणीच्या आईच्या प्रियकराचा खून! प्रेमसंबंधांच्या वादातून धक्कादायक कृत्य, काय घडलं पहा

पुणे / नगर सह्याद्री –
प्रेमसंबंध तोडण्यासाठी मैत्रिणीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाब आणि धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. गणेश संजू बिरादार (वय २५, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तपास करुन प्रियकरासह साथीदारांना अटक केली.

दुर्वांग उर्फ पारस सुनील मानकर (वय २१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा. दत्तवाडी, सिंहगड रस्ता), अभिजित उर्फ अभि संजय इंगळे (वय २२), सोमनाथ रमेश दोरकर (वय २१), साहिल सागर शेलार (वय २४, सर्व रा. हडपसर), चंद्रशेखर सोमनाथ जावीर (वय २०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांना अटक करण्यात आली.

खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुर्वांग मानकर हा सराईत आहे, त्याचे एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. तर, गणेश बिरादार याचे तरूणीच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. गणेश विवाहित होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गणेशने तरुणीला दुर्वांगसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले होते. त्याने तिच्यावर दबाब आणला होता. त्याने तरुणीच्या आईला याबाबतची माहिती दिली होती. या कारणावरुन दुर्वांग आणि गणेश यांच्यात वाद झाले होते.

३ मे रोजी हडपसरमधील ससाणेनगर भागात असलेल्या इमारतीच्या परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास गणेश थांबला होता. त्यावेळी आरोपी दुर्वांग आणि साथीदार तेथे आले, त्यांनी गणेश याला मारहाण करीत डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून पसार झाले. गंभीर जखमी गणेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक अमित शेटे, अजय हंचाटे, हवालदार प्रवीण काळभोर, नीलेश देसाई, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, परशुराम पिसे, राजू वाघमारे, शाहिद शेख, बालू ठाकूर, राकेश साळुंके, अतुल पंधरकर यांनी ही कारवाई केली.

हे सुद्धा वाचा :  अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी, पार्थ पवारांनाही सल्ला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ