अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक कलबुर्मे, पोलीस अंमलदार राजेंद्र सुद्रिक यांच्यासह दहा जणांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रदिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पोलीस मुख्यालयात सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रदान प्रदान करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह हे महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट कामगिरी, तपास आणि सेवेसाठी दिले जाणारे अत्यंत मानाचे पदक आहे. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, मुक्तारखान गुलजारखान पठाण, प्रल्हाद गीते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद गोल्हार, मनोहर शेजवळ, अजय नगरे, संजय खंडागळे, नितीन गांगुर्डे, पोलीस अंमलदार राजेंद्र सुद्रिक यांना हे पदक मिळाले आहे.
या मानाच्या पदकाचे वितरण महाराष्ट्रदिनी दि. १ मे रोजी पोलीस मुख्यालय येथे होणार असून, राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते दहा जणांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.










