श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील खून, दरोडा, गंभीर दुखापत, चोरी, फसवणूक आणि मारामारीसारख्या विविध गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
बुधवार (दि. 8 जुलै) रोजी श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात ठेवण्यात आलेल्या 35 आरोपींना शासनाच्या नियमानुसार व दुय्यम कारागृहाचे अधीक्षक यांच्या आदेशानुसार कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवत कारागृहात हलविण्यात आले.ही कारवाई जिल्हाधिकारी पंकज आशिया व पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या आदेशानुसार करण्यात आली. तहसीलदार तथा दुय्यम कारागृह अधीक्षक सचिन डोंगरे आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, पोलीस निरीक्षक प्रदीप माने, श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच जेलर बाबुराव कारखिले यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.या कारवाईमुळे दुय्यम कारागृहातील न्यायालयीन कोठडीतील आरोपींचे नियमानुसार स्थलांतर करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.










