- जाहिरात -spot_img
breaking news

आ. अक्षय कर्डिले यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट.. काय कारण

शिवाजी महाराजांच्या स्मारकासह विविध विकासकामांचा प्रस्ताव सादर

राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार अक्षय कर्डिले यांनी भरीव विकास निधीची मागणी केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासह शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासह नागरिकांना आधुनिक आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांचे प्रस्ताव पत्राद्वारे सादर करण्यात आले आहेत.

आ. अक्षय कर्डिले यांनी राहुरी शहराच्या प्रवेशद्वाराजवळील जुन्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारणे, वाढत्या चोरी व गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, विविध अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी तसेच इतर नागरी विकासकामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून येत्या काही दिवसांत आवश्यक विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा :  नगरमध्ये वीज प्रवाहामुळे दोन म्हशींचा मृत्यू; ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार, ऑईल चोरीला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ