- जाहिरात -spot_img
breaking news

शेवगाव पोलीस ऍक्शन मोडवर; सालवडगावचा मावा कारखाना उद्ध्वस्त; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपी ताब्यात, शेवगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शेवगाव | नगर सह्याद्री
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार शेवगाव पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेंतर्गत शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालवडगाव शिवारात अवैधरित्या चालणार्‍या एका मावा कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३१ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

बुधवार, दि. २० मे रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. सालवडगाव गावात राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि मशीनच्या साहाय्याने कच्च्या व पक्क्या सुपारीमध्ये सुगंधी तंबाखू मिळवून मावा तयार केला जात आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी लागलीच तपास पथक बोलावून पंचांसह सालवडगाव शिवारात छापा टाकला. इम्रान निसार शेख (वय २२), सोहेल अफ्सर शेख (वय २१, दोघे रा. सालवडगाव, ता. शेवगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता, हा माल मुज्जीप मुस्सा शेख व परवेज मुस्सा शेख (दोघे रा. शेवगाव) यांच्या मालकीचा असल्याचे त्यांनी कबूल केले. या चौघांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात पो.कॉ प्रशांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करत आहेत.

३१ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन वाहने आणि मावा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. मावा तयार करण्याच्या २ मशीन, सुगंधी तंबाखू/सुपारीचे एकूण ६४ बॉस आणि गोण्या, २७ पोते, १३० किलो तयार मावा, महिंद्रा पिकअप गाडी, छोटा हत्ती, इलेट्रॉनिक वजन काटा, बॅटरी आणि ड्रम-टब असा मिळून ३१ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या पथकाने केली कारवाई
सदरची कारवाई शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस हवालदार किशोर काळे, पो.कॉ. भगवान सानप, शाम गुंजाळ, संपत खेडकर, एकनाथ गर्कळ, राहुल खेडकर, सचिन पिरगळ, रोहित पालवे, कृष्णा मोरे, प्रशांत आंधळे आणि अर्जुन मुंढे यांच्या पथकाने केली.

हे सुद्धा वाचा :  ‘नो हॉकर्स झोन व पे अँड पार्क’ला ‘हॉकर्स’चा तीव्र विरोध, काय घडलं पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ