- जाहिरात -spot_img
breaking news

शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरी….श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
शालेय विदयार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रीगोंदा पोलिसांनी शाळा व महाविद्यालय परिसरात विशेष मोहीम राबवत विनाकारण फिरणाऱ्या आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात कडक कारवाई केली. या मोहिमेत दोन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत काही तरुण दुचाकींवरून शाळा व महाविद्यालय परिसरात फेऱ्या मारत असल्याच्या, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवून गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची दखल पोलिसांनी घेतली.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने 1 जुलै रोजी सकाळी व दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेत साध्या वेशातील महिला पोलीस व अंमलदारांसह परिसरात सापळा रचून कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ विनाकारण थांबलेल्या तरुणांची चौकशी करण्यात आली. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्यात आली. हुल्लडबाजी करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारची टवाळखोरी किंवा शांतता भंग करणारे कृत्य आढळल्यास न्यायालयामार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला.यावेळी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन करत, शाळा किंवा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड, विनाकारण फिरणे किंवा हुल्लडबाजी आढळल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष अथवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  लग्न समारंभात हरवलेले सात तोळ्यांचे दागिणे केले
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ