- जाहिरात -spot_img
breaking news

ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला;

भारताकडून या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे आखाती देशांमधील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून भारताने या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सुदैवाने, ओमानच्या प्राधिकरणाने तातडीने बचाव मोहीम राबवून सर्व भारतीय क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “व्यापारी जहाजे आणि निष्पाप खलाशांना वारंवार लक्ष्य केले जाणे हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.”जगातील ९५ टक्के व्यापार समुद्री मार्गाने होत असताना अशा हल्ल्यांमुळे केवळ भारताचीच नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. या घटनेनंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने या क्षेत्रात आपली गस्त आणि देखरेख वाढवली आहे. सर्व भारतीय जहाजांना विशेष ‘सुरक्षा प्रोटोकॉल’ पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या जहाजांना इशारा दिला आहे. या आधीही या संघर्षात अनेक भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. १ मार्च २०२६ रोजी ‘स्कायलाईट’ तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात २ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. ‘MKD VYOM’वर झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका भारतीय खलाशाने जीव गमावला.’Ayeh’ या जहाजावर झालेल्या हल्ल्यात एक भारतीय गंभीर जखमी झाला होता.

हे सुद्धा वाचा :  महागाईचा भडका! १ एप्रिलपासून 'या' वस्तू होणार महाग, कोणाला बसणार झळ, पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ