- जाहिरात -spot_img
breaking news

स्टेटसवरून कर्डिले समर्थक संतप्त

मंत्री विखे, आ. तनपुरे यांच्यासोबतच्या फोटोतून आ. कर्डिले कट

राहुरी | नगर सह्याद्री
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या समवेत असलेला आमदार अक्षय कर्डिले यांचा फोटो तनपुरे यांच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या स्टेटसला ठेवताना काढून टाकल्याने कर्डिले समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे.

शनिवारी 18 जुलैला राहुरी येथे विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले, प्रांताधिकारी, तहसीलदार, तनपुरे व कर्डिले समर्थकांनी हजेरी लावली होती. मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेच्या आढावा बैठकीस राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अक्षय कर्डिले यांच्या समवेत प्राजक्त तनपुरे हे राहुरीत प्रथमच एकत्र आल्याने हा मनोमिलन कार्यक्रम पाहण्यासाठी विखे, तनपुरे, कर्डिले  यांचा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या डाव्या बाजूला आमदार कर्डिले तर उजव्या बाजूला आमदार तनपुरे यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बैठकीनंतर तनपुरे यांच्या काही कार्यकर्त्यांनी स्टेटसला पालकमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा फोटो ठेऊन आमदार कर्डिले यांचा फोटो कट केल्याने कर्डिले समर्थकांनी संताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा :  ‘हॉटेल रेटिंग’च्या नावाखाली व्यावसायिकाची २६ लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांवर गुन्हा दाखल
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ