- जाहिरात -spot_img
breaking news

रियान परागला ड्रेसिंग रूममध्ये ‘वेपिंग’ करणं पडलं महागात; बीसीसीआयने सुनावली कडक शिक्षा

नवी दिल्ली / नगर सह्याद्री :
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (वेपिंग) ओढल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला आयपीएल प्रशासनाने कडक शिक्षा सुनावली आहे. सोशल मीडियावर परागचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे आयपीएलमधील शिस्तीच्या नियमांकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

मॅच फीच्या २५ टक्के दंड अन् डिमेरिट पॉईंट
आयपीएलने (IPL) अधिकृत माहिती देताना सांगितले की, रियान परागने (Riyan Parag ) खेळाडूंच्या आचारसंहितेचे (Code of Conduct) उल्लंघन केले आहे. तो लेव्हल १ मधील कलम २.२१ अंतर्गत दोषी आढळले असून, हे कलम ‘खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी’ संबंधित आहे. शिक्षा म्हणून परागच्या मॅच फीमधील २५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. यासोबतच त्याच्या नावावर एक ‘डिमेरिट पॉईंट’ देखील नोंदवण्यात आला आहे.

एका रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सने या हंगामासाठी परागला १४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. या हिशोबाने त्याची एका सामन्याची फी अंदाजे १ कोटी रुपये होते. म्हणजेच, २५ टक्के दंडानुसार त्याला २५ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. पहिल्यांदाच असा गुन्हा केल्यावर बसलेला हा दंड अत्यंत मोठा मानला जात आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आयपीएलने हे कडक पाऊल उचलले आहे.

एकीकडे हा वाद सुरू असताना राजस्थान रॉयल्सने मैदानावर मात्र चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांपैकी ६ सामन्यांत विजय मिळवून १२ गुणांसह संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पराग ज्या सामन्यात वेपिंग करताना सापडला, तो सामनाही राजस्थानने ६ गडी राखून जिंकला होता. आता १ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात राजस्थानची नजर प्लेऑफमधील आपले स्थान अधिक भक्कम करण्यावर असेल.

हे सुद्धा वाचा :  तमिळनाडूमध्ये काँग्रेसने डाव टाकला! काय घडलं पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ