- जाहिरात -spot_img
breaking news

विधानपरिषदच्या जागावाटपाचा तिढा सुटेना; अहिल्यानगरच घोड अडलं…

फॉर्म्युला ठरवण्यासाठी एकत्र बसून मार्ग काढू ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | नगर सह्याद्री
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. विधानपरिषदच्या जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने महायुतीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत आमची चर्चा सुरू असून, आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून, यावर निश्चितच मार्ग काढू, असा विश्वास व्यक्त केला.

मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथील नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर प्रमुख उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या निवडणुकांबद्दल आमची सविस्तर चर्चा सुरू आहे. साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या दोन जागांवर चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुण्याच्या जागेवरून चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र बसून यावर निश्चित मार्ग काढू. अजून अंतिम मार्ग निघालेला नाही, पण यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शिवसेना ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या पारंपरिक जागांवर दावा करणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची महत्त्वाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकते. तसेच पुण्यासह इतर महत्त्वाच्या जागांवर भाजपने आपला दावा कायम ठेवला आहे. या संभाव्य फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल?
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या अंतर्गत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. यापूव भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार अशी चर्चा होती. मात्र, आता नवीन समीकरणानुसार भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  तयारी पूर्ण ; राहुरी, बारामती पोटनिवडणुकीच्या घोषणा याच महिन्यात..., किती मतदार वाढले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ