मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड घडली आहे. आठवड्याभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडणा-या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनाच शिविगाळ केली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकावले. तसंच पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटील यांनी अतिशय अर्वाच्च भाषा वापरली. एवढंच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना मारण्याची धमकीही त्यांनी ऑन कॅमेरा दिली.
संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेला खाजदार संजय दिना पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांना जे काही पत्र द्यायची आहेत ते त्यांना देऊ द्या मी खुले काम बोललो आहे, मी कारवाईला सामोरे जायला तयार आहे, त्यांनी हवं तर त्यांची सिक्युरिटी सोडून इथे यावे आम्ही पण तयार आहोत, मी सिक्युरिटी मागितलेली नाही! हिच लोक दादा लोकांना फोन करून सिक्युरिटी मागवतात, त्यांना मी आधी मानसन्मान दिला आहे. मला कुणालाही मारायची गरज नाही, लोक माझ्यावर प्रेम करतात. शिंदेंनी मला शाबासकी दिली आहे. माझा अपमान होतो म्हणून मी तिकडे गेलो आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.
संजय पाटील यांनी याआधी त्यांनी पाच जणांना मारलेल या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी यावर ही घटना मी जन्मल्या आधी घडले असल्याचं वक्तव्य केलं. राजुल पाटील यांच्या बद्दल प्रश्न विचारले असता ते चांगलेच भडकले अन् संतापले. ए भाई बंद कर ना… नाही तर विसरुन जाईल मी खासदार आहे. परत आलात कर मारुन टाकेल असं संजय दिना पाटील म्हणाले.
सुनील राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर संतापले
सुनील राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. संजय दिना पाटील हा विषय संपलेला आहे. पक्ष सोडल्याने ते आता भरकटलेले आहेत. पश्चाताप होत आहे त्यांना. मानसिक संतुलन बिघडले आहे. ईशान्य मुंबईची जागा भाजप काही सोडणार नाही याची जाणीव त्यांना झालीय. त्यामुळे ते असं बोलतायत. त्याने तिकडे जावून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली असा टोला सुनील राऊत यांनी लगावलाय स्वतः सांगतोय की पाच मर्डर केलेत म्हणून…पण कारवाई कोण करणार. कुणीही कारवाई नाही करणार. इथं प्रश्न उपस्थित करून थोडीच न्याय मिळणार आहे का… राऊत कभी किसीसे डरते नही है. संजय दिना पाटील हे सिनियर आहेत. त्यांनी बोलताना काळजी घ्यावी असे आमदार पंकज भोयर म्हणाले.










