- जाहिरात -spot_img
breaking news

तनपुरेंना भाजपची खुली ऑफर; तनपुरेंनीही स्पष्टच सांगून टाकले…

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी ठरणार तनपुरेंची राजकीय दिशा / २० तारखेला कार्यकर्त्यांचा राहुरीत मेळावा | माजी मंत्री तनपुरेंच्या निर्णयाकडे मतदारसंघाचे लक्ष
अहिल्यानगर / राहुरी | नगर सह्याद्री-
राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी राजकीय पातळीवरील स्टार प्रचारक नेत्यांच्या सभेने वातावरणात रंगत भरली असून, २० एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघारी घेतली असली तरी त्यांनी अजून कोणाला पाठिंबा दिला नसून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार रिंगणात असूनसुद्धा त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविली आहे. भाजप नेत्यांकडून त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर देण्यात आली असली तरी अद्याप त्यांनी पक्ष प्रवेश करायचा की नाही, याबाबत कोणताचा निर्णय घेतला नाही. २० तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे हे पुढील भूमिका जाहीर करणार असल्याने या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले रिंगणात आहेत. दुसरीकडे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जात त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिल्याने तनपुरे यांनी निवडणुकीच्या रिंंगणातून माघारीचा निर्णय जाहीर केला. राहुरी तालुक्याचा विकास, भूसंपादनाचे प्रश्न आणि सहकारी साखर कारखाना वाचवणे या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने माजी मंत्री तनपुरे यांनी निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्याचे सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे अपक्ष तर यांच्यासह सात उमेदवार निवडणूक लढत आहे. भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी दोन सभा घेत कर्डिले यांना निवडून देण्याचे आवाहन केलेे. तसेच प्राजक्त तनपुरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. सभापती राम शिंदे, उमेदवार अक्षय कर्डिले यांनीही तनपुरे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे सांगितले. त्यामुळे तनपुरे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी भाजपची मंडळी उत्सुक असली तरी भाजपमध्ये यायचे की नाही, याचा निर्णय अजून तनपुरे यांनी जाहीर केला नाही. याशिवाय निवडणुकीतून माघार घेतली असली तरी त्यांनी पक्षाचा प्रचार केला नसून, कोणालाच पाठिंबा दिला नसल्याने त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात दि.२० एप्रिल रोजी त्यांनी राहुरीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार असल्याने माजीमंत्री तनपुरे यांच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीसह भाजपच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  अजितदादांच्या विमान अपघाताची अपडेट समोर; व्हीएसआर कंपनीच्या मालकाने थेट नावचं घेतलं...

उमेदवारी न भरता पाठिंबा दिला, आता अधिकृत पाठिंबा द्यावा ः सभापती शिंदे
राहुरी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असून २३ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदारसंघात प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफरच दिली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, तर त्यांचे स्वागतच आहे असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तालुयाच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे सांगितले. तनपुरे भाजपमध्ये आले, तर आम्ही दोघे मिळून राहुरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. तनपुरे यांनी उमेदवारी न भरता पाठिंबा दिला आहे, आता त्यांनी अधिकृत पाठिंबा द्यावा असे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ