- जाहिरात -spot_img
breaking news

वाढीव मालमत्ता कर नोटिसांवर नगरसेवक योगीराज गाडेंचा आक्षेप

नागरिकांवरील अतिरिक्त करभाराविरोधात आयुक्तांना पत्र
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर महानगरपालिकेकडून अलीकडे नागरिकांना पाठविण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कर मूल्यांकन नोटिसांविरोधात नगरसेवक योगीराज गाडे यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. याबाबत त्यांनी आयुक्तांना अधिकृत पत्र देत वाढीव मूल्यांकन तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे.

शहरातील अनेक नागरिकांना अचानक मोठ्या प्रमाणात वाढीव मूल्यांकनाच्या नोटिसा प्राप्त झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या आर्थिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त करभार टाकणे अन्यायकारक असल्याचे गाडे यांनी पत्रात नमूद केले आहे. पत्रामध्ये त्यांनी काही ठोस मागण्या केल्या आहेत. वाढीव मूल्यांकनाच्या सर्व नोटिसा तात्काळ स्थगित कराव्यात, पूर्वीचेच दर कायम ठेवावेत, नव्या मूल्यांकन प्रक्रियेची पारदर्शक चौकशी करावी तसेच नागरिकांच्या हरकती ऐकण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गाडे यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून पूर्णपणे नागरिकांच्या हितासाठी आहे. जनतेवर अन्याय होणार असेल तर मी शांत बसणार नाही. दरम्यान, नागरिकांनीही आपल्या हक्कांसाठी पुढे येत चुकीच्या मूल्यांकनाविरोधात हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. महापालिकेच्या पुढील भूमिकेकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

सुविधा अपुर्‍या; कर वाढ अन्यायकारक
महानगरपालिकेने प्रथम नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी भूमिका नगरसेवक गाडे यांनी स्पष्ट केली. नियमित पाणीपुरवठा, सुस्थितीत रस्ते, सक्षम स्वच्छता व गटार व्यवस्था या बाबींमध्ये अद्याप अनेक भागांत त्रुटी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सुविधा अपुर्‍या असताना वाढीव मूल्यांकनाच्या माध्यमातून कर वाढवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट आहे. हा अन्याय सहन करणार नाही, असे नगरसेवक गाडे यांनी सांगितले.

 

हे सुद्धा वाचा :  रविराज साबळे यांच्यावरील गुन्हा मागे घ्या
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ