- जाहिरात -spot_img
breaking news

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह तरुण अटकेत; असा लावला सापळा

तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
शहरातील जुना वडगाव गुप्ता रोडवरील जाधव मळा परिसरात तोफखाना पोलिसांनी सापळा रचून एका २५ वर्षीय तरुणाला बेकायदेशीर गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह रंगेहात पकडले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना गुप्त बातमीदारामार्फत एक इसम संशयास्पद रित्या शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी आणि पोलीस कॉन्स्टेबल शाकीर ईस्माईल सय्यद यांच्या पथकाने दोन पंचासह जाधव नगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर बाभळीच्या झाडाखाली सापळा लावला.

​यावेळी पांढऱ्या व राखाडी रंगाचा चौकटीचा शर्ट घातलेला एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. पोलिसांनी त्यास घेराव घालून ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली. झडतीमध्ये आरोपी कुणाल विलास जगताप (रा. निमगाव, ता. राहाता) याच्या कमरेला ३० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि खिशात २०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस मिळून आले. पोलिसांनी एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​पोलीस हवालदार विनोद गंगावणे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार दिनेश मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. हा शस्त्रसाठा त्याने कोणाकडून आणि कोणत्या कारणासाठी आणला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा :  आनंदवार्ता! मान्सून सक्रिय; 8 दिवस राज्यात धो-धो पाऊस...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ