वंदे भारतमधील प्रवास लाभदायी – मुख्यमंत्री फडणवीस
शिर्डी/ नगर सहयाद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारने अनेक मंत्र्यांच्या वाहन ताफ्यात कपात केली आहे. मुख्यमंत्री स्वत: अनुकरण करुन इतरांसमोर उदाहरण प्रस्थापित करत आहेत. मुख्यमंत्री मोटारसायकलरून विधान भवनात आले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते शिर्डी वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन पेट्रोल-डिझेलची बचत केली.
वंदे भारत ट्रेन ही नवं भारताची एक अनुपम भेट पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. आज मी याच ट्रेनने मुंबईवरून साईनगर शिर्डीला आलो. अतिशय उत्तम प्रवास झाला. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांच्या भेटी झाल्या. रस्त्यात फाईल्सची कामं करता आली. मला आजचा प्रवास लाभदायी वाटला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार, आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते शिर्डी प्रवास कारऐवजी रेल्वेने केला. शिडत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.साईबाबाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. खूप आनंदाची गोष्ट आहे. भक्ती आणि शक्ती भारतीय अध्यात्मात एकत्र आहे. आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत. त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करू शकतात, जे शक्तीमान असतात. दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करू शकत नाही. आपण शक्तीमान असलो तर जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले.










