- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेर-कान्हूरपठार मार्गावर सततच्या पावसामुळे खड्डे…

किरण ठुबे यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

पारनेर | नगर सह्याद्री
सततच्या पावसामुळे पारनेर ते कान्हूर पठार मार्गावरील गावाजवळील मुख्य चौक तसेच सनराईज शाळेजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय टाकळी ढोकेश्वर रस्त्यावरील घाटमाथा परिसरातही रस्त्याची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मार्गांवर अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठुबे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये संबंधित रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरून वाहतुकीसाठी रस्ते सुरक्षित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सनी सोनावळे, गणेश तांबे, धनंजय ठुबे, अजित साळवे, सुभाष ठुबे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलन
पारनेर-कान्हूर पठार तसेच टाकळी ढोकेश्वर मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्यांवरून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता वाढली असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ खड्डे बुजवून रस्ते सुरक्षित करावेत. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी.
– किरण ठुबे, अध्यक्ष, जाणता राजा प्रतिष्ठान.

हे सुद्धा वाचा :  जवळ्यात शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीकडे वाढता कल; 200 लिटर अर्क निर्मिती
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ